औरंगाबाद : मनसेच्या जिल्हा अध्यक्ष पदावर दोन दिवसांपूर्वीच विराजमान झालेल्या कन्नड चे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यावर क्रांतिचौक पोलीस ठाण्यात जातीवाचक शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अदालतरोडवर हर्षवर्धन जाधव यांच्या मालकीची जागा आहे.त्या जागेवर नितीन रतन दाभाडे वय-30 (रा.बनेवाडी) या तरुणाने काही दिवसांपूर्वी एक टपरी उभी केली होती.ती टपरी लावल्याचा कारणावरून हर्षवर्धन जाधव टपरीचालक जाधव यांना जातीवाचक शिवीगाळ केली असल्याच फिर्यादीत नमूद केले आहे. या प्रकरणी क्रांतिचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेमूळे जाधव पुन्हा नव्या वादात सापडले आहेत. पुढील तपास साह्ययक निरीक्षक देवकर हे करीत आहेत